शहनाझ गिल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. शहनाझ गिल बिग बॉसमुळे खूप चर्चेत आली होती. तिची बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाशी मैत्री आणि भांडण चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. त्यांना चाहत्यांनी सिडनाज म्हणून संबोधायला सुरुवात केली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर दुःखी झालेली शहनाझ पाहून अनेक चाहते हळवे झाले होते. बराच काळ ती या दुःखाच्या काळातून बाहेर पडू शकली नव्हती. पण आता शहनाझने स्वत:ला सांभाळले आणि पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. पण आता तिचा एका व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचं वागणं पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता शहनाज गिल नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिचं वागणं चाहत्यांना अजिबात आवडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांनी तिला अहंकारी म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शहनाझ सेटवरून व्हॅनिटी व्हॅनमध्ये परतताना दिसत आहे. दरम्यान, काही फोटोग्राफर्स तिला पोझ देण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत. पण शहनाझ त्यांना, “नंतर भेटू. मी आता काम करत आहे.” असं म्हणताना दिसत आहे.
आणखी वाचा- “किमान देवाचा मान ठेव…” अंकिता लोखंडेचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

आणखी वाचा- “आम्ही एकत्र फिरलो तर…” राघव जुयालला डेट करण्याच्या चर्चांवर शहनाझ गिलचे स्पष्टीकरण

एवढंच नाही तर जेव्हा फोटोग्राफर्सनी शहनाझ गिलला, “तू कशी आहेस?” असं विचारलं, तेव्हा शहनाझ मागे वळून म्हणाली, “जर मी म्हणाले की माझी तब्येत ठीक नाही तर तुम्ही काय बोलणार? औषध द्याल का?” या सगळ्यात कोणीतरी मागून, “प्रार्थना करू. तू लवकर ठीक होण्यासाठी” असं म्हणताना ऐकू येतं. यावर शहनाझ म्हणते, “तू प्रार्थना का करणार?” शहनाझचं हे वागणं काही युजर्सना उद्धट वाटत आहे आणि यामुळे चाहत्यांनी तिला अहंकारी म्हटलं आहे.

शहनाझच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं, “एवढा गर्व, एवढा अहंकार कशासाठी? हिचे हे रूप बिग बॉसमध्येही पाहायला मिळाले होते, तेव्हाच सलमान खानने याबाबत थोडी काळजी घेण्याचे सांगितले होते.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.” याशिवाय या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये, ‘अॅटीट्यूड तर बघा’, ‘बाप रे’ अशा आशयाच्या अनेक कमेंट्स आहेत. तर काही युजर्सनी शहनाझच्या समर्थनार्थ कमेंट केली. या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आली आहे असं काहींचं म्हणणं आहे.