अभिनेत्री शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काही काळापूर्वी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले होते. या सगळ्यातून आता शहनाज कुठे सावरत आहे. तिने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातला तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहनाजने साखरपुड्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शहनाजने मराठी चित्रपट सैराट झिंगाटच्या गाण्यावर डान्स केला आहे. यात शहनाजने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मात्र, शहनाजचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. त्यात नेटकऱ्यांचे लक्ष हे सिद्धार्थसोबत ‘बिग बॉस १३’ मध्ये असलेला आसिम रियाजने वेधलं आहे.

आणखी वाचा : शहनाजचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने दोनदा केला होता साखरपुडा!

शहनाजच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आसिमने कमेंट केली आहे. “काही डान्स क्लिप्स पाहिले. लोक पटकन आपल्या लोकांना विसरतात आणि पुढे जातात. काय झाल. नवीन जग,” अशी कमेंट आसिमने दिली आहे. आसिम आणि सिद्धार्थ हे ‘बिग बॉस १३’मध्ये एकत्र होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehnaaz gill got trolled for dancing in engagement ceremony on zingaat song dcp