‘बिग बॉस १३’ मधून जबरदस्त लोकप्रियता मिळवलेली पंजाबी अभिनेत्री आणि गायक शहनाज गिलच्या करिअरचा आलेख सध्या उंचावताना दिसून येतोय. शहनाज गिल तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिचा हा फोटो पाहून चाहते सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री आणि गायक शहनाज गिल नुकतीच टॉप मॅगझीन असलेल्या ‘फिल्मफेअर’च्या कव्हरपेजवर झळकलीय. प्लॅटिनम बोन्ड विग आणि ट्रान्स्परंट स्ट्रॅप ड्रेसमध्ये शहनाजचा हा स्टायलिश अंदाज पाहून सगळे फॅन्स चक्रावून गेले आहेत. तिचा हा लूक आतापर्यंत कधीच पहायला मिळाला नव्हता. या फोटोमधील तिच्या हेअरस्टाइलपासून ते तिच्या ड्रेस आणि मेकअपवरून फॅन्सची नजरच हटत नव्हती. फिल्मफेअरने तिचा हा फोटो शेअर केल्यानंतर काही मिनीटांतच तिच्या नव्या लूकचा फोटो वाऱ्यासारखा पसरला.

फिल्मफेअर मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणं ही काही साधी गोष्ट नाही. अशात अभिनेत्री शहनाज गिलने हे करून दाखवल्याबद्दल तिचं कौतुक देखील केलं जातंय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी शहनाज गिला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे आणि आता तिला मिळालेलं हे यश पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

 


तिचं हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी केलंय. फिल्मफेअरने शहनाजचा फोटो शेअर केल्यानंतर सुरूवातीला फॅन्सना विश्वास बसला नाही. इतक्या कमी वेळेत ती फिल्मफेअर मॅगझीनच्या कव्हरपेजवर कशी काय झळकली? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. “खरंच ही सना आहे का?”, “मला तर विश्वास बसत नाही की ही सना आहे म्हणून” अशा वेगवेगळ्या कमेंट्स तिच्या फोटोवर दिसून येत आहेत. तर काही युजर्सनी तिच्या नव्या लूकचं कौतुक केलंय.

शहनाज गिलच्या बाबतीत आणखी सांगायचं झालं तर लवकरच तिचा ‘हौसला रख’ हा चित्रपट रिलीज होणारेय. या चित्रपटात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ सुद्धा झळकणारेय. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाच्या ब्रेकअपच्या चर्चांना देखील उधाण आलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehnaaz gill is ruling on filmfare cover page like a queen in white hair and transparent dress prp