छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले. त्याच्या अकाली निधन ही बाब संपूर्ण इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का मानला जातो. सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकारच्या झटक्याने झाले. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सिद्धार्थ आणि अभिनेत्री शेहनाज गिल ही जोडी ‘बिग बॉस १३’च्या घरात असताना चर्चेत होती. अभिनेत्री शेहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. या सगळ्यातून आता शेहनाज कुठे सावरत आहे. नुकतंच शेहनाजचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती सिद्धार्थ आणि पुनर्जन्माबद्दल भाष्य करताना दिसत आहे.

शेहनाज गिलने नुकतंच सिद्धार्थची बहिण बी.के शिवानीसोबत बातचित केली. यावेळी तिच्या या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शहनाजने असे म्हणाली की, मी सिद्धार्थला नेहमी म्हणायची की मला शिवानीशी बोलायचे आहे. मला त्या फार आवडतात. मग त्यावेळी सिद्धार्थ शहनाजला सांगायचा की ती त्याच्याशी एक दिवस नक्की बोलेल. आता त्याच्या निधनानंतर ती शिवानी सिस्टरशी बोलत आहे.

या व्हिडीओत शहनाज ही सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी ती म्हणाली, “आमचा हा प्रवास अजून व्हायचा आहे. त्याचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्याचे कपडे बदलले आहेत, पण तो कुठेतरी आला आहे. त्याचे स्वरूप बदलले आहे, परंतु तो पुन्हा या रूपात आला आहे. त्याचे माझ्याकडील खाते सध्या तात्पुरते बंद आहे. पण कदाचित त्यानंतर ते पुन्हा सुरु होईल,” असे तिने सांगितले.

“सिद्धार्थ गेला तेव्हा शेहनाज ही प्रचंड रडत होती. त्यावेळी शेहनाजची ही अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला होता. सिद्धार्थच्या जाण्यानंतर माझी जगण्याची इच्छा संपली होती. मी आता काय करेल,” असा प्रश्न मला पडला होता, असेही ती म्हणाली. मात्र त्यानंतर मी स्वत:ला सावरले होते.

‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ काँग्रेस नेत्याच्या मुलाने अभिनेत्री अमिषा पटेलला केलं उघडपणे प्रपोज, स्पष्टीकरण देताना म्हणाली…

शेहनाज गिलचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं. सिद्धार्थ आणि शेहनाज याचं खास नात होतं. दोघं लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र यावर दोघांनी शिक्का मोर्तब केलं नव्हत. ‘बिग बॉस’ शोमध्ये शेहनाज आणि सिद्धार्थची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघं काही अल्बममध्येही झळकले होते. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी पसंती दिली होती.

Story img Loader