अभिनेत्री शहनाझ गिलला पंजाबची कतरीना कैफ म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शहनाझ गिल सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. बिग बॉसमध्ये असताना त्यानंतर शहनाझचं खासगी आयुष्य आणि सिद्धार्थ शुक्लाशी असलेली तिची मैत्री याबद्दल बरीच चर्चा झाली होती. शहनाझ ही लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यासोबतच पुन्हा एकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहनाज गिलचे नाव एका अभिनेत्याशी जोडलं जात आहे. मात्र नुकतंच तिने या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

शहनाझ गिल सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याच चित्रपटातून प्रसिद्ध डान्सर राघव जुयालदेखील बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. ते दोघंही सलमानच्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत. पण आता काही मीडिया रिपोर्टनुसार शहनाझ आणि राघव यांच्यात मैत्रीपलीकडे काही असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचेही दिसून येत आहे. अनेकदा ते सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. मात्र नुकतंच शहनाजने यावर मौन सोडले आहे.
पतौडी पॅलेस ८०० कोटी रुपयांना विकत घेण्यामागचे कारण काय? सैफ अली खानने केला खुलासा

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

नुकतंच तिला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शहनाजने राघव जुयालला डेट करण्याबद्दल विचारले होते. यावेळी तिने या सर्व अफवा असल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले. ती म्हणाली, मीडियामधील प्रतिनिधी खोटं का बोलतात? ते प्रत्येकवेळी अशाप्रकारे खोटं बोलत असतात आणि अफवा पसरवत असतात. जर मी कोणासोबत उभी राहिली किंवा त्याच्यासोबत फिरली तर मी त्याला डेट करते असे होत नाही. मीडिया फार फालतू गोष्टी बोलतो. आता मी चिडेन.

शहनाझ गिल पुन्हा प्रेमात? ‘या’ अभिनेत्याशी जोडलं जातंय नाव

दरम्यान शहनाझ गिल याआधी अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘बिग बॉस’ शोमध्येच या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघांनी काही अल्बम साँगमध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळाली होती. पण सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने शहनाझसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाझ खूप एकटी पडली होती. मात्र काही महिन्यांनंतर तिने स्वतःला सावरलं आणि आता ती आनंदी आयुष्य जगताना दिसतेय.

Story img Loader