अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल पूर्णपणे खचली. काही काळ ती प्रसारमाध्यमं, कॅमेऱ्यापासून लांबच राहिली. सिद्धार्थाच्या निधनाचं दुःख पचवणं तिच्यासाठी खूप अवघड होतं. क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने एकटी राहणारी शहनाज आता स्वतःला सावरताना दिसत आहे. तिने हळूहळू कॅमेऱ्यासमोर येण्यास सुरुवात केली आहे. तसेच ती सलमान खानबरोबर चित्रपट करणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. नुकताच पारंपरिक ड्रेसमधील तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनाही आनंद झाला.
एका कार्यक्रमाला शहनाजने हजेरी लावली होती. यावेळी तिने अगदी साधा ड्रेस परिधान केला होता. तसेच ती या कार्यक्रमाच्या मंचावर येताच समोर बसलेल्या प्रेक्षक मंडळींना पाहिलं आणि गोड हसली. पहिल्यासारखं तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहून चाहत्यांचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला होता. शहनाज स्वतःला सावरतेय ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.
आणखी वाचा – कतरिनाने पतीसोबत शेअर केला स्विमिंगपूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज
या कार्यक्रमासाठी शहनाजने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तसेच या ड्रेसवर तिने मल्टी कलर ओढणी घेतली होती. तिचा अगदी साधा लूक असला तरी शहनाज यावेळी खूप सुंदर दिसत होती. शहनाजने नव्याने तिच्या कामाला सुरुवात केली आहे. तिचे सतत व्हायरल होणारे फोटो पाहून एवढ्या लवकर सिद्धार्थला विसरलीस का? असे प्रश्नही तिला विचारण्यात येत आहेत. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याचं शहनाजने ठरवलं आहे.
आणखी वाचा – फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शाहरुख खानच्या हाती, ‘मन्नत’मध्ये झालं ग्रँड सेलिब्रेशन
काही दिवसांपूर्वीच सलमानची बहिण अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईद पार्टीला शहनाजने हजेरी लावली होती. यादरम्यानचा सलमान आणि शहनाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता पुन्हा मागे न वळून पाहण्याचं शहनाजने नक्की केलं आहे.