लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ रूपी चौथे सिनेपुष्प रसिक दरबारी सादर केले. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुलचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळाले. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘शेर शिवराज’चा डंका वाजत असून लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत, साहसदृश्ये या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. पहिल्या दोन आठवडयांच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या आठवड्यातही ‘शेर शिवराज’ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’नंतर ‘शेर शिवराज’च्या रूपात ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटानं यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचं चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पहायला मिळत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, ‘शेर शिवराज’च्या टिमने घेतलेल्या मेहनतीवर रसिकांनी कौतुकाची थाप मारल्याचं सांगणारे हे आकडे आहेत.

Ratnagiri loksatta
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पक्ष प्रचारापुरते; महाविकास आघाडी, महायुतीत एकही जागा नाही
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
leopard stuck in a tree in Rajapur, Rajapur leopard, Ratnagiri,
रत्नागिरी : राजापुरात झाडावर अडकलेल्या बिबट्याला सोडविण्यास वन विभागाला यश
Morning walk of tiger family in Pench tiger project video goes viral
‘मॉर्निंग वॉक’ करताय! पण वाघाचे कुटुंब…
Aabhalmaya
२५ वर्षांनी एकाच मंचावर आले ‘आभाळमाया’चे कलाकार, सर्वांना पाहून भारावले प्रेक्षक; कमेंट करत म्हणाले, “आम्ही नशीबवान…”
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
Pradhan kridangan Mumbai
मुंबई: सर्कससाठी मैदान देण्यास चेंबूरमधील नागरिकांचा विरोध
mother and children love
‘माझ्या आईसारखे शूर जगात कोणी नाही…’ लेकराला वाचविण्यासाठी सिंहाबरोबर केला सामना; थरारक VIDEO पाहून फुटेल घाम

आणखी वाचा : नवरीने नवरदेवाला पाण्यात धक्का देण्याच्या प्रयत्नात घडले असे काही, पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?

टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला ९७% रेटींग मिळालं आहे. परदेशांमध्ये सध्या १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये ‘शेर शिवराज’ पाहिला जात आहे. यात युएसएमधील २०, जर्मनीतील १०, दुबईमधील १०, युकेमधील ५, कॅनडातील ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे. याखेरीज फिनलॅन्डमध्ये ३, युएई, बहारीन, ओमानमध्ये ५ शोज सुरू आहेत. हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. परदेशांमध्ये मराठी चित्रपटाला मिळत असलेलं हे यश खूप मोठं आणि मराठी सिनेसृष्टीच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅलिफोर्नियास्थित फाइव्ह डायमेंशन एंटरटेनमेंटच्या सहकार्याने मुंबई मूव्ही स्टुडिओजने हे आंतरराष्ट्रीय वितरण केले आहे. मुंबई मुवी स्डुडिओजच्या साथीने जीसीसी देशातील वितरणाची जबाबदारी दीपा भारथ यांनी सांभाळली.

आणखी वाचा : “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा माझा गैरसमज…”, भाषेच्या वादावर जावेद जाफरीचे परखड मत

तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत. ‘शेर शिवराज’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीमुळे प्रत्येक सेंटरमध्ये शोजची संख्या वाढवावी लागली. तरीही प्रेक्षकांना तिकीट्स अपुऱ्या पडल्याचे चित्रपट अनेक ठिकाणी पहायला मिळाले. चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘शिवबा राजं…’ या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन डान्स करत आहेत.

आणखी वाचा : शनिदेव करणार मार्गक्रमण, या ४ राशींच्या लोकांना करिअरमध्ये होणार जबरदस्त फायदा

डोक्यावर फेटे, पगडी, हातात भगवे झेंडे आणि मुखानं ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत प्रेक्षकांचे लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. हे दृश्य केवळ भारतातच नव्हे, परदेशातही पहायला मिळत आहे. परदेशामध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘शेर शिवराज’च्या गाण्यांचा बोलबाला होता. ‘शेर शिवराज’च्या रूपात ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेच्या मुकूटात आणखी एक माणिकरत्न जडलं गेलं आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटाची प्रस्तुती आणि निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, नवीन चंद्रा यांनी राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांच्या साथीने केली आहे.

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

‘शिवराज अष्टक’ मध्यावर पोहोचलं असताना ‘शेर शिवराज’नं एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढील चित्रपटात दिल्लीचे तख्त राखण्यासाठी त्या दिशेनं कूच करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे.