बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने अनेकांना समन्स बजावले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री शर्लिन चोप्रा आहे. मुंबई गुन्हे शाखेने शर्लिनची जवळपास ८ तास चौकशी केली. शर्लिनला मुंबई गुन्हे शाखेने १६० सीआरपीसी अंतर्गत चौकशीसाठी बोलावले होते. यामुळे शर्लिनची शुक्रवारी चौकशी करण्यात आली होती. यावेळी शर्लिनने शिल्पाचे नाव घेत एक धक्कादायक खुसाला केला आहे.

मुंबई गुन्हे शाखेने शर्लिनचा जबाब नोंदवल्यानंतर तिने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिचे व्हिडीओ हे शिल्पाला आवडतात असे सांगत राज कुंद्राने तिची दिशाभूल केली होती. राज कुंद्रा तिचा मेंटॉर होता, ती जे काय शूट करते ते ग्लॅमरसाठी असल्याचे सांगतं राजने तिची दिशाभूल केल्याचे तिने सांगितले.

आणखी वाचा : पत्नीच्या गंभीर आरोपांनंतर अखेर यो यो हनी सिंगनं सोडलं मौन, म्हणाला…

‘राज कुंद्रा मला नेहमी सांगायचे की शिल्पा शेट्टीला माझे फोटो आणि व्हिडिओ आवडतात. यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळाली. जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांकडून प्रेरित होतात, तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूकीच आहे. जेव्हा असे व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे कौतुक झाले, तेव्हा मला असे आणखी व्हिडीओ करण्याची प्रेरणा मिळाली,’ असे शर्लिन म्हणाली.

आणखी वाचा : ‘राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पासोबतचे संबंध ठीक नाहीत आणि…’, शर्लिन चोप्राचा धक्कादायक दावा

जेव्हा शर्लिनला सांगितले की हे सगळे आरोप शिल्पाने फेटाळले असून तिला पॉर्नोव्हिडीओ विषयी काही माहित नाही आहे. यावर शर्लिन म्हणाली, ‘शिल्पा खूप व्यस्त असतात. त्यामुळे त्या विसरल्या असतील.’

 

Story img Loader