अभिनेत्री शिबानी दांडेकर काही दिवसांपूर्वीच अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. फरहान आणि शिबानी यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. १९ फेब्रुवारीला या दोघांनी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलं. त्यांच्या या लग्नाला बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटी आणि त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती होती. लग्नानंतर तिच्या इन्स्टाग्रामवर काही बदल केले होते. तिनं तिच्या बायोमध्ये मिसेस अख्तर असं लिहिलं होतं. पण आता लग्नानंतर १२ दिवसांतच तिनं बायोमधून हे मिसेस अख्तर काढून टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नानंतर काही दिवसांनी शिबानी दांडेकरनं तिच्या इन्स्टाग्रावरील नावात बदल केले होते. तिचं नाव शिबानी दांडेकर बदलून तिने ते शिबानी दांडेकर अख्तर असं केलं होतं. याशिवाय बायोमध्येही तिनं ‘मिसेस अख्तर’ असं लिहिलं होतं. पण आता हे तिच्या बायोमध्ये दिसत नाहीये. तिनं बायोमधून हे शब्द काढून टाकले आहे. मात्र यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. एवढंच नाही तर तिने इन्स्टाग्रामचा प्रोफाइल फोटो देखील बदलला आहे.

आणखी वाचा- ‘डॅन्सची एक लाखाची सुपारी…’ मराठी भाषादिनाच्या पोस्टवरून किरण मानेंनी उडवली सोनाली कुलकर्णीची खिल्ली

दरम्यान शिबानी आणि फरहान यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर शिबानी प्रेग्नंट असल्यानं या दोघांनी लग्न केलं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. ज्यावर शिबानीनं प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच इन्स्टाग्रामवर स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत तिने फोटोंमध्ये पोट दिसण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा- फरहानशी लग्नानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चांवर शिबानी दांडेकरनं सोडलं मौन, म्हणाली…

शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती अॅब्स दाखवताना दिसत होती. हा व्हिडीओ शेअर करत प्रेग्नन्सीच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं शिबानीनं म्हटलं होतं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी एक स्त्री आहे आणि मी प्रेग्नंट नाहीये, हे केवळ टकीलामुळे झालं होतं.’

दरम्यान फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी त्यांच्या लग्नानंतर इन्स्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले होते. हे दोघंही २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. फरहानच्या कामाबद्दल बोलायचं तर, तो आगामी काळात ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shibani dandekar deleted mrs akhtar from her instagram bio just after 12 days of marriage mrj