बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. येत्या २१ फेब्रुवारीला हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र फरहान किंवा शिवानी या दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिबानीने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या फरहान आणि शिबानीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे बोललं जात आहे. त्यातच नुकतंच शिबानीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे लग्नाच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. शिबानीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोला शिबानीने हटके कॅप्शन दिली आहे. ‘थकलेली पण उत्साही’, असे तिने हा फोटो पोस्ट करताना म्हटले आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक युजर्स हे विविध तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. शिबानीला तिच्या लग्नाच्या तयारीचा उत्साह असल्याचे पोस्टमधून दिसत आहे. त्यासोबत तिला थकवाही जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान तिच्या या पोस्टवर क्रिकेट प्रेझेंटर गौरव कपूरने कमेंट केली आहे. ‘मी पुढच्या वीकेंडला थकायला खूप उत्सुक आहे’, असे त्याने म्हटले आहे.
फरहान आणि शिबानी गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत आहेत. करोनामुळे त्यांना लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही. फरहान-शिबानीच्या लग्नाचे रिसेप्शन मॉरिशसमध्ये होणार आहे. येत्या २१ फेब्रुवारीला ते दोघेही कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नासाठी त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाचीकडून कपडे डिझाइन करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कृपया असला कचरा…”, दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट पाहिल्यानंतर कंगना रणौतची संतप्त टीका
तीन वर्षांपूर्वी फरहान आणि शिबानी यांची भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये होते. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्या दोघांचे फोटो कायम चर्चेचा विषय ठरत होते. पण आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.