काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर अभिनेता फरहान अख्तरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. फरहान आणि शिबानी मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १९ फेब्रुवारीला या दोघांनी शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केलं. त्यांच्या या लग्नाला बॉलिवूडमध्ये सेलिब्रेटी आणि त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती होती. पण जेव्हा शिबानी आणि फरहान यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर शिबानी प्रेग्नंट असल्यानं या दोघांनी लग्न केलं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. आता यावर शिबानीनं प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून शिबानीच्या प्रेग्नन्सीची जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. यावर आता शिबानीनं मौन सोडलं आहे. शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती अॅब्स दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रेग्नन्सीच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं शिबानीनं म्हटलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी एक स्त्री आहे आणि मी प्रेग्नंट नाहीये, हे केवळ टकीलामुळे झालं होतं.’

आणखी वाचा- …जेव्हा रणबीर कपूरनं भर रस्त्यात केलं होतं दीपिकाच्या एक्स बॉयफ्रेंडशी भांडण

दरम्यान फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी त्यांच्या लग्नानंतर इन्स्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले होते. हे दोघंही २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहिल्यावर शिबानीच्या प्रेग्नन्सीच्या अफवा उडू लागल्या होत्या. फरहानच्या कामाबद्दल बोलायचं तर, तो आगामी काळात ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shibani dandekar reacts on pregnancy rumors after married with farhan akhtar mrj