अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नानंतर शिबानी दांडेकर प्रेग्नंट असल्यानेच या दोघांनी लग्न केलं अशा अफवा देखील उडाल्या होत्या. पण आता या सर्व चर्चांवर मौन सोडत शिबानी दांडेकरनं फरहान अख्तरशी लग्न करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर एकमेकांना २०१६ पासून डेट करत होते. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर फरहाननं शिबानीसोबतनं नातं सर्वांसमोर मान्य केलं होतं. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असत आणि अखेर या वर्षी त्यांनी लग्न करून आपल्या या नात्याला नवं नाव दिलं. खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर हा विवाहसोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. पण शिबानीच्या एका पोस्टमुळे तिनं नक्की फरहानशी लग्न का केलं याचा खुलासा झाला आहे.
आणखी वाचा- ‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणतात “तो नेहमीच अति…”
दिग्दर्शिका आणि डान्स कोरिओग्राफर फराह खान हिने महिला दिनाच्या निमित्तानं तिच्या इन्स्टाग्रमवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यात तिने शिबानीला ‘वहिनी’ असं संबोधलं होतं. तिची ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना शिबानीनं फरहानशी लग्न करण्याचं कारण सांगितलं. तिने लिहिलं, ‘तुमची वहिनी होण्यासाठी मी फरहानशी लग्न केलं.’ शिबानीची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
आणखी वाचा- हृतिक- सबा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? जवळच्या मित्रानं केला मोठा खुलासा
दरम्यान शिबानी आणि फरहान यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर शिबानी प्रेग्नंट असल्यानं या दोघांनी लग्न केलं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. ज्यावर शिबानीनं प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच इन्स्टाग्रामवर स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत तिने फोटोंमध्ये पोट दिसण्यामागचं कारण स्पष्ट केलं होतं.
आणखी वाचा- ‘झुंड’ चित्रपटावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला, “नागराज मंजुळे तुम्हाला…”
शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती अॅब्स दाखवताना दिसत होती. हा व्हिडीओ शेअर करत प्रेग्नन्सीच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं शिबानीनं म्हटलं होतं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘मी एक स्त्री आहे आणि मी प्रेग्नंट नाहीये, हे केवळ टकीलामुळे झालं होतं.’