अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर त्यांच्या लग्नानंतर सातत्यानं चर्चेत आहेत. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर दोघंही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. चाहत्यांसोबत ते त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच शिबानीनं फरहानच्या नावाचा टॅटू गोंदवून घेत त्याला वाढदिवसाची भेट दिली होती. त्यानंतर आता नुकताच तिनं नव्या टॅटूचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याची बरीच चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फरहान आणि शिबानी यांनी १९ फेब्रुवारी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्न केलं. ज्यात त्यांचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. त्यांतर शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. ज्या ती तिचा टॅटू फ्लॉट करताना दिसत आहे. हा टॅटू फक्त शिबानीच नाही तर फरहानसाठीही खास आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार फरहान आणि शिबानीनं वेडिंग सेरेमनीनंतर २१ फेब्रुवारीला त्यांचं लग्न कोर्टात रजिस्टर केलं. त्यामुळे अर्थातच लग्नाची तारीख या दोघांसाठीही खास आहे. शिबानीनं ही तारीख टॅटूच्या स्वरूपात आपल्या हातावर गोंदवून घेतली आहे. लग्नानंतर शिबानीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातावर XXI.II.XXII हे वेडिंग डेटचे रोमन नंबर दिसत आहेत.

दरम्यान लग्नानंतर शिबानीने सोशल मीडियावर तिचे नाव बदलले आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा बदल केला आहे. शिबानीचे लग्नाआधी शिबानी दांडेकर असे नाव होते. तर आता शिबानीने त्याला बदलत ‘शिबानी दांडेकर अख्तर’ असे केले आहे. तर तिने तिच्या बायोमध्ये आणखी एक बदल केला आहे. तो म्हणजे, ‘निर्माती, प्रेझेंटर, अभिनेत्री, गायिका आणि सौ. अख्तर’ असे केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shibani dandekar special new tattoo after get married with farhan akhtar photo goes viral mrj