टी.व्ही अभिनेत्री शिल्पा सखलानी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडणारी पाचवी सेलिब्रिटी ठरली आहे. ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेतून नावारूपास आलेली शिल्पा ही कोणत्याही भांडण किंवा वादात नसल्यामुळे आपण शोमधून लवकर बाहेर पडल्याचे तिचे म्हणणे आहे.
या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत कामिया पंजाबी, व्हीजे अँण्डी, तनिशा मुखर्जी आणि अरमान कोहली यांचीदेखील नावे होती. पण, शनिवारी झालेल्या अॅलिमिनेशनमध्ये सलमान खानने शिल्पाचे नाव घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यापूर्वी हेजल किच, अनिता अडवाणी, रतन राजपूत, रजत रावाली या शोमधून बाहेर पडले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-10-2013 at 11:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa agnihotri evicted from bigg boss