बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. योगासह वेगवेगळे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत तिने एक मोठी पोस्टही लिहिली आहे.
शिल्पाने शेअर केलेला व्हिडीओ जिममधील आहे. या व्हिडीओत आधी ती पाठमोरी उभी असल्याचं दिसतंय. शिल्पा केस बांधत आहे. त्यानंतर ती वर्कआऊट करू लागते. मात्र केस बांधत असतानाच शिल्पाचा नवा हेअर कट दिसून येतोय. कॅप्शनमध्ये शिल्पाने तिने ‘अंडरकट बझ कट’ केल्याचं म्हंटलंय. शिल्पाचा हा नवा हेअर कट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. तिच्या हेअर कटवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
‘या’ व्यक्तीची समांथाला वाटते भिती; व्हिडीओ शेअर करत म्हणाली “तू इथे नसतानाही मी तुला घाबरते”
कॅप्शनमध्ये ती म्हणाली, “प्रत्येक दिवस विना रिस्क आणि कम्फर्ट झोन बाहेर न येता जगू शकत नाही. मग तो अंडरकट बज कट असो (खरं सांगते यासाठी खूप हिंमत लागते).” असं लिहीत शिल्पाने तिने मोठ्या हिंमतीने हा हेअर कट केल्याचं म्हंटलं आहे.
“चेकअप करताना अचानक त्याने…”; लहानपणी अनेकदा डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा नीना गुप्तांनी केला खुलासा
काही नेटकऱ्यांनी शिल्पाचा नवा हेअर कट पाहून तिचं कौतुक केलंय. तर काहींनी मात्र कमेंट करत तिची थट्टा केली आहे. एक युजर म्हणाला, “अर्धी टकली झाली.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तिरुपतिला जावून केस काढले वाटतं आणि वरुन वीग घातलं आहे.”
या व्हिडीओत शिल्पाने तिच्या वर्कआउट बद्दलही सांगितलं आहे. शिल्पा कायमच योगा आणि वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत अनेकांना प्रेरणा देत असते.