बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांचे वैयक्तिक आयुष्य स्वतःपर्यंत मर्यादीत ठेवायला आवडते. भारतातील सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी अनेकवेळा मोठ्या रकमेची ऑफर त्यांना दिली. दरम्यान, आजपर्यंत कोणीही याप्रकारच्या ऑफरचा स्वीकार केलेला नाही.
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
२००७ मध्ये, जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ब्रिटिश रिअॅलिटी शो ‘बिग ब्रदर’मध्ये विजेती ठरली होती, तेव्हा तिथल्या मीडियाने तिचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. एका ब्रिटीश टॅब्लॉइडने शिल्पाचा एक्स बॉयफ्रेंड अक्षय कुमारला शिल्पासोबतच्या त्याच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी, त्यावेळी सुमारे ३४ लाख रुपयांची ऑफर दिली होती.
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
त्यांना अक्षयकडून जाणून घ्यायचे होते की, त्याचे शिल्पासोबतचे अफेअर कधी आणि कसे सुरू झाले? त्या दोघांचं रिलेशनशिप कसं होतं? आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? मात्र अक्षयने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला की, “मी शिल्पाविषयी कोणाशीही बोललो नाही आणि कधीच बोलणार नाही. मला कितीही रक्कम दिली तरी हरकत नाही.”
आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात
अक्षय आणि शिल्पाने कधीही नकार दिला नाही की त्यांच्यामध्ये कधीच काही नव्हते. बिग ब्रदर शोमध्ये स्वतः शिल्पाने स्वतःबद्दल आणि अक्षयबद्दल सांगितले की, “एकेकाळी ती आणि बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार एकमेकांच्या प्रेमात होते. आता ही गोष्ट जुनी झाली आहे.” अक्षयचे एक कुटुंब आहे आणि आम्ही आपापल्या आयुष्यात खूप पुढे आलो आहोत.
आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर
दरम्यान, फक्त अक्षयला त्याच्या लव्ह लाईफच्या खुलाशासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली नव्हती, तर शिल्पाने नंतर खुलासा केला की तिलादेखील ही ऑफर देण्यात आली होती. पण ती अक्षयसोबतच्या नात्याचा आदर करते आणि त्याबद्दल ती कधीच बोलणार नाही.