बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलीय. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. दरम्यान या कारवाईत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची काही बँक खाती देखील सील सकरण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज कुंद्रा अटकेत असतानाच आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीत अधिक वाढ झालीय. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर आयोसिस वेलनेस सेंटरच्या नावावर अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लखनऊमधील हसरतगंज पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर आता लखनऊ पोलिसांची टीम या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झालीय. लखनऊमधील जोस्तना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या चौकशीत शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात पुरावे हाती लागल्यास शिल्पा शेट्टीला आईसह अटक होण्याची शक्यता आहे.

शिल्पा आयोसिस वेलनेस सेंटर नावाची एक फिटनेस चेन चालवते. या कंपनीची ती चेअरमन असून तिची आई सुनंदा या कंपनीच्या डायरेक्टर आहे. या फिटनेस चेनच्या ब्रॉन्चसाठी शिल्पा आणि तिच्या आईने अनेकांकडून कोट्यावधी रुपये घेतले मात्र नंतर पाठ फिरवली असे शिल्पा आणि सुनंदा शेट्टी यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी आता शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला नोटीस बजावण्यात आलीय.  याप्रकरणाची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती लखनऊ इस्टचे डीसीपी संजीव सुमन यांनी दिलीय.

यापूर्वी सेबीने शिल्पा शेट्टीला ३ लाखांचा दंड ठोठावला होता. ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी सेबीने वियान इंडस्ट्रीजला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. आता सेबीने ही तक्रार मागे घेतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty and mother sunanda shetty in trouble after raj kundra fraud in wellness center business kpw