बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही अत्यंत धकाधकीचे जीवन जगत आहेत. पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. तर दुसरीकडे यावरुन शिल्पा शेट्टीवरही अनेक गंभीर आरोप होत आहेत. यामुळे आता शिल्पा ही राज कुंद्रापासून विभक्त होणार अशा चर्चा सुरु आहेत.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी ही लवकरच राज कुंद्रापासून विभक्त होणार आहे. शिल्पाला राज कुंद्राचा पैसा, त्याची मालमत्ता याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. ती स्वत: कमवत असल्याने लवकरच ती राज कुंद्राला घटस्फोट देईल, असे बोललं जात आहे.
तर दुसरीकडे घटस्फोटानंतर शिल्पा तिची मुले विआन आणि मुलगी समिक्षासोबत घर सोडणार आहे. या सर्व गोष्टींचा तिच्या मुलांवर काहीही परिणाम होऊ नये. म्हणून ती वेगळी होणार असल्याचे बोलल जात आहे. मात्र दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते दोघेही सामान्य जीवन जगत आहे. त्या दोघांच्या नात्यात कोणतीही कटुता आलेली नाही. त्यामुळे ते घटस्फोट घेणार नाहीत, असेही बोललं जात आहे.
शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्राने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे आहे.