बॉलिवूडमधील हॉट मॉम्सपैकी एक म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पाने काल ४६ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिच्या मित्रपरिवाराने आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शिल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. आता शिल्पाने वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ बुमरॅंग व्हिडीओ आहे. या व्हिडीओत शिल्पाने पांढऱ्या रंगाचे कोट परिधान केल्याचे दिसतं आहे. तर शिल्पा तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहित असल्याचे दिसतं आहे. तिच्या समोर अनेक केक आहेत. तर शिल्पाच्या हातात फुगे आहेत. त्यातल्या एका फुग्यावर एसएसके लिहलं आहे. एसएसके म्हणजे शिल्पा शेट्टी कुंद्रा.

तर शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसाठी आणि मित्रपरिवारासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. “मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. यासाठी मी तुमचे पुरेसे आभार मानू शकत नाही. तुमच्या सर्व मेसेजेस, कॉल, केक्स आणि फुलांबद्दल तुमचे आभार. प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस एवढा खास केल्याबद्दल धन्यावाद,” असे कॅप्शन देत शिल्पाने तो व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

शिल्पा लवकरच ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा २’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर, सध्या शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर ४ ची परिक्षक आहे.

Story img Loader