सोशल मीडिया म्हणजे कलाकारांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. कलाकार मंडळी सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे विविध व्हिडीओ, फोटो शेअर करण्याकडे नट-नट्यांचा अधिक कल असतो. पण काही कलाकार आजही सोशल मीडियापासून दूर आहेत. तसेच काहींनी सोशल मीडियाला रामराम केला असल्याचंही समोर आलं होतं. यामध्येच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाचाही समावेश झाला आहे.

शिल्पाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिल्पाने ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर करत याद्वारे माहिती दिली. “सातत्याने एकच गोष्ट पाहणं कंटाळवाणं वाटू लागलं आहे. सगळीकडे तेच तेच दिसत आहे. जेव्हा मला नवं काहीतरी पाहायला मिळेल तेव्हाच मी सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय होईन.” असं शिल्पाने तिच्या पोस्टद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा – Loksatta Exclusive : ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघेंचा लूक पाहून सलमानही भारावला; प्रसाद ओकला म्हणाला, “भाई क्या…”

शिल्पाची सोशल मीडियावरील ही शेवटची पोस्ट आहे. सोशल मीडियावर शिल्पाचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत. तरीदेखील शिल्पाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिल्पाने काही दिवसांपूर्वीच एक प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे सतत आपल्याला सांगण्यात येतं. म्हणूनच इतर कोणाच्याही गोष्टींची नक्कल करणं योग्य नाही.”

आणखी वाचा – ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी मानधन? बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांनाही टाकलं मागे

शिल्पा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ देखील सतत शेअर करताना दिसते. पण आता काही काळासाठी तरी शिल्पाच्या नव्या पोस्ट, फोटो तिच्या चाहत्यांना पाहता येणार नाहीत. याआधी शिल्पाचा पती राज कुंद्राने देखील सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर सोशल मीडियापासून दूर राहण्याचं त्याने ठरवलं.

Story img Loader