बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहताना दिसतेय. पण नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे शिल्पा पुन्हा चर्चेत आली आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मंचावर शिल्पा शेट्टीनं चक्क प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या डोक्यावर बॉटल फोडली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी रोहितशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण तो मात्र गायक बादशाहसोबत बोलण्यात बिझी असतो. शिल्पा त्याला वारंवार हाक मारते पण तो तिच्याकडे लक्ष देत नाही. यावर शिल्पाला राग येतो आणि ती म्हणते, ‘आता माझी सटकली.’ एवढं बोलून शिल्पा काचेची बाटली रोहितच्या अंगावर फोडते आणि म्हणते, ‘रोहित मला चित्रपट दे.’ यावर रोहित म्हणतो, ‘वेडी आहेस का माझा सूट खराब केलास.’ रोहितचं बोलणं ऐकल्यावर शिल्पा उरलेल्या बॉटल्स बादशाहच्या अंगावर फोडते.

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

आणखी वाचा- फरहानशी लग्नानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चांवर शिबानी दांडेकरनं सोडलं मौन, म्हणाली…

शिल्पानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘गरम झाली केटली, आता माझी सटकली, फोडून टाकली मी बाटली. पंगा नाही घ्यायचा… काय?’ याशिवाय या अगोदर शोच्या मेकर्सनी रोहित शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील एक सीन या दोघांनी रिक्रिएट केलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा- आशुतोष राणा यांचा ‘शिव तांडव’ व्हिडीओ फेसबुकवरून डिलिट, अभिनेत्यानं व्यक्त केली नाराजी

शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची ‘हंगामा २’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातून शिल्पानं बऱ्याच वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं होतं. या चित्रपटासाठी शिल्पा खूप उत्साहित होती. पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच शिल्पाचा पती राज कुंद्राला अटक झाली. त्यानंतर काही काळासाठी शिल्पानं टीव्ही आणि अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. आगामी काळात ती ‘निकम्मा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader