अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पती राज कुंद्रा यांच्यासोबत अज्ञात स्थळी आपला वाढदिवस मंगळवारी साजरा केला. खुद्द शिल्पानेच वाढदिवसानिमित्त राजसोबत एका गुप्त ठिकाणी जात असल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे आपल्या चाहत्यांना सोमवारी दिली. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी फुलांचा गुच्छ घेतलेला एक फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याचबरोबर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राज कुंद्रांसोबत रेस्तराँमधील काही फोटोही तिने इन्स्टाग्रामवरच शेअर केले आहेत. यावेळी शिल्पाने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तिच्या आवडत्या रेस्तराँमध्ये या दोघांनी रात्रीचे जेवण घेतले.

Story img Loader