बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती चाहत्यांसोबत सतत मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या शिल्पाने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची स्टाइल कॉपी केल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हॅलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. ज्या प्रकारे कभी खुशी कभी गम या चित्रपटात शाहरुखन खान हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतो. दरम्यान, शिल्पाने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे.
Video:वहिनीसाहेब, विलासराव देशमुखांच्या सूनबाई आहात…; सलमानसोबतच्या त्या व्हिडीओमुळे जिनिलिया ट्रोल

हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने ‘घरी परत आल्यामुळे होणार आनंद वेगळाच असतो. आपण सर्वजण थोडे K3G (कभी खुशी कभी गम) प्रमाणे आहोत’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १. ६ मिलियन लोकांनी पाहिला आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांसोबतच कलाकार देखील कमेंट करताना दिसत आहेत. करण जोहरने कमेंट करत हार्ट असलेले इमोजी वापरले आहे. तर एका यूजरने हा व्हिडीओ पण चांगला आहे. पण ओरिजनल-ओरिजनल असतो असे म्हटले आहे. सध्या शिल्पा शेट्टी इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. ती सेटवरचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty copied shahrukh khans style made a entry from the helicopter avb