बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा तिच्या वर्कआऊट आणि योगामुळे नेहमीच चर्चेत असते. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. योगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांना योगा करण्यास प्रवृत्त करते. आता शिल्पाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाची दोन्ही मुल योगा करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शिल्पाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाचा मुलगा विहान योगा करताना दिसत आहे. तर समिषा तिच्या भावासारखा योगा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : सैफने सांगितले होते अमृताशी घटस्फोट आणि करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण

आणखी वाचा : समांथाच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी

हा व्हिडीओ शेअर करत “मुलं ही ओल्या मातीसारखी असतात. त्यामुळे निरोगी जीवनशैलीकडे त्यांचे लक्ष आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. सकस आणि संतुलित आहाराचा आनंद घेण्याची सवय लावणे, तंदुरुस्त राहणे आणि मन आणि आत्म्यावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे, त्यात मी आता हे विहानसोबत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासोबत आता तो त्याच्या छोट्या बहिनीला समिषाला कसा शिकवतो हे पाहूण मला अभिमान वाटतो. त्यांनी योगाशी असे जोडणे खरोखरच एक प्रेरणा आहे. जे मला निरोगी राहण्यासाठी गरजेचे आहे…त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यासाठी”, शिल्पाने असे कॅप्शन दिले आहे.

Story img Loader