बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. शिल्पाने नुकताच तिच्या लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या मुलीचा हा गायत्री मंत्र बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा तिच्या मुलीसोबत त्यांच्या बागेत दिसत आहे. यावेळी समिषा ही त्या जखमी झालेल्या पक्षाकडे बघत असते. त्यावेळी शिल्पा तिच्याकडे बघून बोलते “समिषा, तू प्रार्थना करत आहेस का? पक्ष्याला बरं वाटावं म्हणून, तो बरा व्हावा म्हणून तू प्रार्थना करत आहेस का?” आईचं हे बोलणं ऐकून समिषा पक्ष्याकडे बोट दाखवत बोलण्याचा प्रयत्न करते, “बर्डी बू बू”. शिल्पा म्हणते, “तो पक्षी जखमी आहे. उपचार घेऊन तो बरा होईल लवकर. तू त्याच्यासाठी प्रार्थना करतेयस का?” आणि शिल्पा गायत्री मंत्र बोलू लागते. शिल्पाने शेअर केलेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
आणखी वाचा : “स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत पण…”, विजु माने यांची पोस्ट चर्चेत
समिषाचा हा व्हिडीओ शेअर करत शिल्पा म्हणाली, ‘लहान मुलांचं मन खरंच पवित्र असतं. समिषा अजून दोन वर्षांचीही झाली नाही. पण सहानुभूती आणि एखाद्यासाठी प्रार्थना करण्याची तिची भावना पाहून माझंही मन भरून आलं. ही गोष्ट आपल्यासारख्या मोठ्यांनाही कळू शकली असती तर बरं झालं असतं. त्या पक्ष्याचे प्राण वाचवल्याबद्दल पेटाचे आभार.’