बॉलिवूडची योगा गर्ल अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. त्यामुळे चाहतेदेखील तिला थेट प्रश्न विचारत असतात. यात अनेकदा शिल्पाला तिच्या उंचीवरुन प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळेच शिल्पाने तिचा एक व्हिडीओ शेअर करत तिची उंची नेमकी किती आहे हे सांगितलं आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिला पुन्हा एकदा तुझी उंची किती आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हसत हसत शिल्पाने तिची खरी उंची सांगितली आहे.
“खरं तर हा प्रश्न मला कायमच विचारण्यात येतो. तर माझी उंची पाच फूट साडेआठ इंच इतकी आहे”, असं उत्तर शिल्पाने दिलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये शिल्पाने तिच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यात तिला मालदीव हे ठिकाण प्रचंड आवडत असल्याचंदेखील तिने सांगितलं. शिल्पा तिच्या वर्कआऊटसोबत स्वभावामुळेदेखील चर्चेत असते. अनेकदा ती चाहत्यांसोबत किंवा छायाचित्रकारांसोबत दिलखुलास गप्पा मारताना पाहायला मिळते.