उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मीती प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे. मागील आठवडाभरापासून अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सने राज कुंद्रा यांच्या या उद्योगासाठी आणि अश्लील चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी आपल्याकडे विचारणा करण्यात आल्याचा दावा केलाय. असं असतानाच आता एका मॉडेलने तिला आलेल्या ऑफरबरोबरच राज कुंद्रांच्या या हॉटशॉट्स अॅपसाठी शुटींग केल्याने एका मुलीला तिच्या पतीने घटस्फोट दिल्याचा दावा केलाय.
पूनम पांडे, सागरिका शोना यासारख्या मॉडेल्सने मागील काही दिवसांपासून राज कुंद्रांच्या या अश्लील चित्रपट निर्मितीच्या उद्योगांसंदर्भात गंभीर आरोप केल्याचं दिसून आलं. याच प्रकरणासंदर्भात आता निकिता फ्लोरा सिंग या मॉडेलने ट्विटरवरुन राज कुंद्रांनी आपल्यालाही हॉटशॉट्ससाठी ऑफर दिली होती, असं म्हटलं आहे. सुदैवाने मी या ऑफरला नकार दिला. मात्र माझ्या ओळखीतील एका मुलीने या अॅपवरील व्हिडीओंमध्ये काम केल्याने तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिल्याचा धक्कादायक खुलासा निकिता फ्लोरा सिंगने केलाय.
नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी
कुंद्रा प्रकरणामध्ये न्यूड ऑडिशनसंदर्भातील माहिती समोर येत असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत निकिताने एक ट्विट केलं आहे. “नोव्हेंबर २०२० मध्ये उमेश कामतने मला राज कुंद्राच्या हॉट्सशॉट्स या अॅपसाठी न्यूड शूट करण्याची ऑफर दिलेली. कामतने मला दिवसाला २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवलेली. देवाचे आभार आहेत की मी या मोठ्या नावाला भुलले नाही. झारखंडमधील एका मुलीला तिच्या पतीने घटस्फोट दिला जेव्हा त्याला कळलं की तिने यासाठी शूट केलं आहे,” असं निकिताने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
I was also asked by #UmeshKamat to shoot #nude for #rajkundra‘s app #Hotshots in Nov 2020,but I refused. Kamat offered Rs 25k/day. Thank God I did not fall for big name of https://t.co/KqaIglFBEU girl from #jharkhand got divorce from her husband because she shot for them. pic.twitter.com/YHCaJ79FRD
— Nikita Flora Singh (@NikitaFloraS) July 21, 2021
नक्की वाचा >> पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…
दरम्यान, पोलीस चौकशीमध्ये दीड वर्षांमध्ये राज कुंद्रांनी १०० हून अधिक पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्याची माहिती समोर आल्याचे समजते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अश्लील चित्रपट बनवण्याचं काम राज कुंद्रा हे ऑगस्ट २०१९ पासून करत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी १०० हून अधिक अश्लील चित्रपटांची निर्मिती केलीय. गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंद्रांनी या उद्योगामधून कोट्यावधी रुपये कमवल्याचंही सांगितलं जात आहे. ज्या अॅपच्या माध्यमातून हे अश्लील चित्रपट अपलोड करुन प्रसारित करण्यात येत होते त्या अॅपला २० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स होते. यामधूनच कुंद्रा यांना कोट्यावधी रुपये मिळायचे, असं गुन्हे शाखेच्या सुत्रांनी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> पोलीस कोठडीमध्ये वाढ नको, राज कुंद्रांनी करोनाचं कारण देत उच्च न्यायालयात घेतली धाव; म्हणाले…
…म्हणून केली अॅपची निवड
वेबसाईटऐवजी कुंद्रांच्या कंपनीने अॅपचा पर्याय निवडण्यामागेही एक कारण असल्याचं समोर आलं आहे. वेबसाईटच्या तुलनेत अॅप हे वापरण्यास अधिक सोयीस्कर ठरेल या विचारातून वेबसाईटऐवजी अॅप सुरु करुन त्या माध्यमातून या चित्रपटांचं वितरण करण्यात आलं. तसेच वेबसाईटवर कारवाई झाल्यावर तिच्यावर बंदी येऊ शकते मात्र अॅप पूर्णपणे बंद करता येत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मॉडेल्स आणि अभिनेत्री केवळ अशाप्रकारच्या चित्रपटांमध्येच काम करतात आणि कुंद्रा यांचा वापर करुन या चित्रपटांची निर्मिती करायचे.