बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ही तिचा पती उद्योगपती राज कुंद्राच्या अटकेनंतर वारंवार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पा ही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली नाही. एवढंच नव्हे तर ती तिच्या शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या शूटिंगसाठी देखील उपस्थित राहत नव्हती. मात्र, या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर आता शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. तसंच ती तिच्या सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळ्या ड्रेसेमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिल्पा ट्रेंडनुसार स्वतःला अपडेट करत असते. तिच्या या अनोख्या फॅशनचे असंख्य चाहते आहेत. नुकताच शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक आगळ्या वेगळ्या साडी मधील फोटो शेअर केला आहे. या फोटोला देखील नेटकऱ्यांची प्रचंड प्रमाणात पसंती मिळताना दिसून येत आहे. तिच्या या नवीन लूकवर प्रेक्षक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

शिल्पाने नुकताच जंप सूट साडीचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ती नेहमी प्रमाणेच मोहक दिसत होती. पण तिने परिधान केलेल्या या जंप सूट साडीची किंमत ऐकून तुम्ही चांगलेच चक्रावाल. तर तिच्या या जंप सूट साडीची किंमत आहे फक्त ४५ हजार रुपये. तुम्ही शिल्पाला ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या एपिसोडमध्ये या हटके लूकमध्ये पाहू शकता. तिने आपल्या या फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत “गोल्डन अव्हर #superdancerchapter4 #ottd ” असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, शिल्पाचा हा फ्यूजन लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.

Photo-Qbik website

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून आणखी एक फोटो शेअर केला आहे. शिल्पाने शेअर केलेला या फोटोच्या कॅप्शनमध्ये “केलेल्या चुकीची भरपाई आपल्याला आयुष्यभर करावी लागते. मी चूक करणार, मी त्या चुकीतून शिकणार आणि स्वत:ला माफ करणार”, असे लिहिण्यात आले होते. शिल्पाने  शेअर केलेल्या या फोटोमध्ये “चूक केली, पण ठीक आहे”, असे स्टिकर दिले होते.