अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. काही महिन्यापूर्वी शिल्पाचा ‘निकम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिमन्यू दासानी, शर्ली सेठिया आणि शिल्पा शेट्टी यांचा निकम्मा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सोनल जोशी दिग्दर्शित ‘सुखी’ चित्रपटामध्ये शिल्पा मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून पुढच्या वर्षी ‘सुखी’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या वेब सिरीजमध्ये ती एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

गेले काही दिवस शिल्पा तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होती. या सिनेमातील एका दृश्याच्या सादरीकरणादरम्यान तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. झालेल्या अपघातामुळे शिल्पाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. पाय पूर्णपणे बरा होण्यासाठी सहा महिने लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच या कालावधीत आराम करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. यासंबंधित एक फोटो शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
आणखी वाचा-‘तू जबरदस्त गायक…’ कपिल शर्माच्या गाण्यावर शंकर महादेवन यांची प्रतिक्रिया

या फोटोमध्ये शिल्पा व्हिलचेअरवर बसलेली आहे. तिच्या डाव्या पायावर फ्रॅक्चर लावलेले दिसत आहे. या फोटोला शिल्पाने ‘त्यांनी रोल, कॅमेरा अ‍ॅक्शन – ब्रेक अ लेग (ऑल द बेस्ट या अर्थाने) म्हटले. मी खरोखर पाय मोडून घेतला. सहा महिन्यांची सुट्टी. पण थोड्याच काळात मी पुन्हा नव्या जोमाने परतेन. माझ्यासाठी प्रार्थना करा.’ असे कॅप्शन दिले होते.
आणखी वाचा- पाय मोडला तरी शिल्पा शेट्टी करतेय योगा; गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी एकदा बघाच

काही महिन्यापूर्वी शिल्पाने एका कार्यक्रमाला उपस्थित रहायचे वचन त्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांना दिले होते. दिलेला शब्द पाळण्यासाठी ती पाय फ्रॅक्चर असताना या कार्यक्रमाला हजर राहिली. व्हिलचेअरवर बसून आलेल्या शिल्पाचे आयोजकांने व्यवस्थित स्वागत केले. या कृतीमुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. होणारा त्रास सहन करुन दिलेला शब्द पाळल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमामध्ये काढलेला व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात तिने कॅमेऱ्यासमोर वॉकिंग स्टीक घेऊन पोझ दिली आहे.

Story img Loader