बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. एवढंच नाही तर शिल्पा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये ही दिसली नाही. मात्र, आता शिल्पाने पुन्हा एकदा या शोच्या चित्रकरणाला सुरुवात केली आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनीटीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘सुपर डान्सर ४’चा प्रोमो शेअर केला आहे. त्यावरून कळते की आगामी एपिसोड हा अमर चित्र कथांवर आधारीत आहे. या प्रोमोमध्ये सगळे स्पर्धक अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. तर शिल्पा सोबत गीता मॉं आणि अनुराग बासू दिसत आहेत. या एपिसोडमध्ये अर्शियाने तिच्या डान्सने सगळ्यांची मने जिंकली. त्यानंतर शिल्पा कंजक पूजा करते आणि अर्शियाचा आशीर्वाद घेते.

आणखी वाचा : ‘हे सगळ अकल्पनीय आहे’,डिंपल चीमा यांच्यासोबत भेटीनंतर कियारा झाली भावूक

आणखी वाचा : व्हर्जिनिटी ते कार सेक्स; ‘या’ सेलिब्रिटींनी त्यांच्या सेक्स लाईफवर केले होते उघडपणे वक्तव्य

शिल्पा २०१६ मध्ये सुरु झालेल्या ‘सुपर डान्सर’च्या पहिल्या सीझनपासून या शोची परिक्षक आहे. शिल्पासोबत दिग्दर्शक अनुराग बासू आणि कोरिऑग्राफर गीता कपूर हे देखील पहिल्या सीझनपासून शिल्पासोबत शोचे परिक्षक आहेत. पतीच्या अटकेनंतर शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये दिसली नव्हती आता १ महिन्यानंतर शिल्पा शोमध्ये दिसली आहे. शिल्पा जेव्हा शोमध्ये नव्हती तेव्हा तिच्या जागेवर संगीता बिज्लानी, जॅकी श्रॉफ, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, जिनेलिया डिसुजा आणि रितेश देशमुखने हजेरी लावली होती.

Story img Loader