‘बालिकावधू’फेम प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येचे वृत्त कळल्यानंतर केवळ टेलिविश्वालाच नाही तर बॉलीवूडमधील सलमान खानपासून करण जोहपर्यंत सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. ग्लॅमर आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या या छोटय़ा पडद्यावरील कलाकारांच्या समस्या प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. आत्तापर्यंत मॉडेल आणि चित्रपटसृष्टीतील छोटय़ा-मोठय़ा कलाकारांनी अशा पद्धतीने जीवन संपवले होते. मात्र सातत्याने मोठमोठय़ा रिअॅलिटी शोजमधून सक्रिय असलेल्या प्रत्युषासारख्या अभिनेत्रीनेही हाच पर्याय निवडल्यानंतर तिच्याबरोबर काम केलेल्या सहकलाकारांचेही धाबे दणाणले आहे.
प्रत्युषाच्या आत्महत्येमागे तिचा प्रियकर राहुल राज सिंग याच्याकडे सगळ्यांनी बोट दाखवले आहे. प्रियकराबरोबर तिचे बिघडलेले संबंध हे एक कारण पान १ वरून मार्ग यांच्यापैकी अनेक कलाकारांनी पत्करलेला दिसतो. प्रत्युषाही त्याला अपवाद नव्हती. सहा वर्षे आनंदीची भूमिका केल्यानंतर ‘बालिकावधू’ सोडणाऱ्या प्रत्युषाने त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तीन रिअॅलिटी शोजमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या सगळ्यातून आर्थिक गणित साधले गेले नाही तर पुढे काय, हा मोठा प्रश्न या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांसमोर आ वासून उभा आहे. याआधी कुलजीत रांधवा या अभिनेत्रीने ताण सहन होत नाही म्हणून मृत्यू जवळ केला होता. मालिकेमुळे मिळालेली प्रसिद्धी पेलवत नाही म्हणून राजीव खंडेलवालसारख्या अभिनेत्याने छोटय़ा पडद्यापासून दूर राहणे पसंत केले. तर ‘पवित्र रिश्ता’फेम अंकिता लोखंडेनेही सगळे चांगले असून केवळ सुशांत राजपूत सिंगबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल मनात सतत असुरक्षिततेची भावना असते म्हणून त्यातून बाहेर पडणे पसंत केले.
नारायणी शास्त्रीपासून हितेन प्रधानसारख्या एके काळी छोटा पडदा गाजवणाऱ्या कलाकारांनी एका गॅपनंतर जे मिळेल त्यातून टिकून राहण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांनी कामाची ही जीवघेणी असुरक्षितता अनेकदा अनुभवली आहे. मात्र त्यातून मार्ग काढणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. अवघ्या २४ व्या वर्षी आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्या प्रत्युषाच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावरील तथाकथित ग्लॅमरस जीवनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असू शकते. तसेच पैशासाठी गेले काही महिने तिच्यामागे सुरू असलेला तगादा हेही तिच्या आत्महत्येचे कारण असू शकते, असे सांगितले जात आहे. मात्र या सगळ्या गोंधळात तिच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्रीला या संकटातून बाहेर पडण्यासाठी तिच्या सहकलाकार किंवा इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींपैकी कोणाची मदत घ्यावीशी वाटली नाही हे अधिक बुचकळ्यात टाकणारे आहे. तिच्या आत्महत्येनंतर कोकिलाबेन रुग्णालयात तिच्याबरोबर काम केलेल्या सिद्धार्थ शुक्ला, कामया पंजाबी, गुरमीत चौधरी आणि देबिना चॅटर्जी यांच्यासारख्या छोटय़ा पडद्यावरील नावाजलेल्या कलाकारांची झालेली गर्दी या घटनेचा त्यांना बसलेला धक्का किती मोठा होता हे जाणवून देते.
छोटय़ा पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे. सहा-सहा वर्षे एकाच मालिकेत अडकून पडल्यानंतर जेव्हा मालिका संपते तेव्हा पुढची मालिका मिळेपर्यंत येणारा मोठा ब्रेक पचवणे अनेक कलाकारांना अवघड जात आहे. कामाचा ताण, अर्निबध वेळा, ग्लॅमरच्या जगात टिकून राहताना वाढलेले भरमसाट खर्च, नात्यांमध्येही येणारा तणाव-दुरावा, सततचे अफेअर आणि घटस्फोट या सगळ्या समस्यांनी टेलिविश्वाचे कलाकार सध्या ग्रस्त आहेत. मालिका नाही मिळाली तर रिअॅलिटी एके रिअॅलिटी शो करून पैसे मिळवत राहण्याचा मार्ग यांच्यापैकी अनेक कलाकारांनी पत्करलेला दिसतो. प्रत्युषाही त्याला अपवाद नव्हती. सहा वर्षे आनंदीची भूमिका केल्यानंतर ‘बालिकावधू’ सोडणाऱ्या प्रत्युषाने त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तीन रिअॅलिटी शोजमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या सगळ्यातून आर्थिक गणित साधले गेले नाही तर पुढे काय, हा मोठा प्रश्न या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांसमोर आ वासून उभा आहे. याआधी कुलजीत रांधवा या अभिनेत्रीने ताण सहन होत नाही म्हणून मृत्यू जवळ केला होता. मालिकेमुळे मिळालेली प्रसिद्धी पेलवत नाही म्हणून राजीव खंडेलवालसारख्या अभिनेत्याने छोटय़ा पडद्यापासून दूर राहणे पसंत केले. तर ‘पवित्र रिश्ता’फेम अंकिता लोखंडेनेही सगळे चांगले असून केवळ सुशांत राजपूत सिंगबरोबरच्या आपल्या नात्याबद्दल मनात सतत असुरक्षिततेची भावना असते म्हणून त्यातून बाहेर पडणे पसंत केले.
नारायणी शास्त्रीपासून हितेन प्रधानसारख्या एके काळी छोटा पडदा गाजवणाऱ्या कलाकारांनी एका गॅपनंतर जे मिळेल त्यातून टिकून राहण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांनी कामाची ही जीवघेणी असुरक्षितता अनेकदा अनुभवली आहे. मात्र त्यातून मार्ग काढणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. अवघ्या २४ व्या वर्षी आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्या प्रत्युषाच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावरील तथाकथित ग्लॅमरस जीवनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा