बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. काल शिल्पाला वाढदिवसानिमित्ताने खूप भेट मिळाल्या. पण या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष हे शिल्पाने स्वत: ला भेट केलेल्या एका लक्झरी व्हॅनिटी व्हॅनने वेधले आहे. शिल्पाकडे अनेक आलिशान गाड्या आहेत त्या कलेक्शनमध्ये व्हॅनिटी व्हॅनचाही समावेश करण्यात आला आहे.
आणखी वाचा : तीन दिवस आधी करोना पॉझिटिव्ह झालेल्या शाहरुखने लावली नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नात हजेरी, पाहा फोटो
ईटाइमसने दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाने एक व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. ज्यामध्ये स्वयंपाकघर, केस धुण्याचे स्टेशन, ड्रेसिंग टेबल आणि लाउंज देखील आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात योगा करण्यासाठीही एक खास जागा आहे. शिल्पा फिटनेस फ्रिक असल्याने तिने तिच्या व्हॅनिटीमध्ये याची विशेष काळजी घेतली आहे.
आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…
आणखी वाचा : अमिषा पटेलने वडिलांवर केला होता कोट्यावधी रुपयांची फसवणूकीचा आरोप
आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही
आणखी वाचा : लग्नानंतर ‘या’ आलिशान घरात राहते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर
आणखी वाचा : विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची एकूण संपत्ती आणि कमाई ऐकलीत का?
आणखी वाचा : मलायकाच्या घरी पोहोचले पोलिस, व्हिडीओ व्हायरल होताच कारण आले समोर
शिल्पाने ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तिने शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शिल्पाने २९ वर्षांच्या कारकिर्दीत ‘धडकन’, ‘रिश्ते’, ‘इंडियन’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ असे अनेक चित्रपट केले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या ४७ व्या वर्षीही शिल्पा तिच्या लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.