अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि सिल्व्हेस्टर स्टॅलोनसारख्या बलदंड हॉलिवूड अॅक्शन हिरोंचे जगभरात अनेक चाहाते आहेत. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी अनेकजण आतूर असतात. याला बॉलिवूडदेखील अपवाद नाही. एका बॉक्सिंग मॅचच्या ठिकाणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला या दोघांना भेटण्याचे भाग्य लाभले. चायनामधील मकाऊ येथे एका बॉक्सिंग मॅचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हॉलिवूड सुपरस्टार अर्नोल्ड श्वार्झनेगरला भेटली. मकाऊमधील ही बॉक्सिंग मॅच पाहाण्यासाठी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा उपस्थित होते. शिल्पाने अर्नोल्डबरोबरचे आपले छायाचित्र टि्वटरवर पोस्ट केले आहे. हॉलिवूड अॅक्शन हिरो सिल्व्हेस्टर स्टॅलोनदेखील ही मॅच पाहाण्यासाठी आला होता. अर्नोल्ड आणि सिल्व्हेस्टर या दोन महान हॉलिवूड अभिनेत्यांबरोबरचे पती राज कुंद्रा समवेतचे छायाचित्र शिल्पाने टि्वटरवर पोस्ट केले आहे. एका परिसंवादाच्या निमित्ताने अलिकडेच अर्नोल्ड श्वार्झनेगर भारतात येऊन गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty meets arnold schwarzenegger