बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. गेल्या काही महिन्यांपासून शिल्पा पती राज कुंद्रामुळे चर्चेत होती. एवढंच काय तर ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही अफवा असल्याचं शिल्पाने दाखवून दिलं आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. शिल्पा आणि राज यांच्या लग्नाला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या १२ व्या वाढदिवसानिमित्ताने शिल्पाने त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

हे फोटो शेअर करत “१२ वर्षांपूर्वी आपण चांगल्या आणि वाईट काळात साथ देण्याचे, एकमेकांवर कायम प्रेम करण्याचे, विश्वास ठेवण्याचे वचन दिले होते. ते असेच सुरु ठेवू, आम्हाला दररोज मार्ग दाखव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुकी राज कुंद्रा. आपल्या मुलांसाठी, अनेक इंद्रधनुष्य, आनंद आणि बरचं काही. चांगल्या आणि वाईट काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या आमच्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार”, असे कॅप्शन शिलपाने दिले आहे.

आणखी वाचा : लग्नाआधीच विकी आणि कतरिनामध्ये झालं जोरदार भांडण? ‘हे’ ठरलं कारण…

शिल्पा आणि राज कुंद्राचे लग्न २२ नोव्हेंबर २००९ साली झाले आहे. दरम्यान, राज तुरुंगातून बाहेर आल्यापासून हे दोघे बाहेर फिरताना दिसले नाही आहेत. या आधी बऱ्याचवेळा ते एकत्र दिसायचे.

Story img Loader