बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसली नाही. एवढंच नाही तर शिल्पा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये ही दिसली नाही. मात्र, आता शिल्पाने पुन्हा एकदा या शोच्या चित्रकरणाला सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.

‘ईटाइम्स’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिल्पा आज पुढच्या आठवड्याच्या भागाचे चित्रीकरण करत आहे. २०१६ मध्ये सुरु झालेल्या पहिल्या सीझनपासून शिल्पा शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. निर्माते तिच्या परत येण्याची वाट पाहत होते आणि तिच्या जागी दुसऱ्या सेलिब्रिटीला घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. तिने शूटिंग पुन्हा सुरू केल्याने आम्हाला आनंद आहे. आशा आहे की, ती या सीझनच्या शेवटपर्यंत शोमध्ये राहील. तिचा पती अश्लील अॅप्स प्रकरणात अडकल्यानंतर तिच्यासाठी धैर्याने कामावर परत येणे हा तिच्यासाठी भावनिक निर्णय होता. शिल्पा आज पुन्हा शूटिंग करत आहे आणि आता त्यांना शिल्पाच्या जागी दुसऱ्या कोणाला शोधण्याची गरज नाही, म्हणून निर्माते आनंदी आहेत.”

आणखी वाचा : मुलीच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अनिल कपूरचा ‘झक्कास’ डान्स व्हायरल

आणखी वाचा : रिया कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जान्हवी आणि खूशी कपूरला पाहून नेटकरी संतापले

दिग्दर्शक अनुराग बासू आणि कोरिऑग्राफर गीता कपूर हे देखील पहिल्या सीझनपासून शिल्पासोबत शोचे परिक्षक आहेत. शिल्पा जेव्हा शोमध्ये नव्हती तेव्हा तिच्या जागेवर संगीता बिज्लानी, जॅकी श्रॉफ, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, जिनेलिया डिसुजा आणि रितेश देशमुखने हजेरी लावली होती.

Story img Loader