बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शिल्पाचा आगामी चित्रपट ‘निकम्मा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटासाठी तिचे चाहते आणि स्वतः शिल्पा देखील खूप उत्सुक आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शिल्पा वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीत शिल्पानं तिच्या क्रशविषयी सांगितलं आहे. वयाने स्वतःपेक्षा लहान असलेल्या अभिनेत्यावर आपलं क्रश असल्याची कबुली शिल्पानं नुकतीच दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शेट्टी रॅपिड फायर राउंड खेळली. यावेळी तिचा बरेच इंटरेस्टिंग प्रश्न विचारण्यात आले आणि तिने देखील या प्रश्नांची धम्माल उत्तरं दिली. या फन गेममध्ये तिला, ‘सध्याच्या काळातील बॉलिवूड अभिनेत्यांमध्ये तुला कोणता अभिनेता सर्वाधिक आवडतो?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शिल्पा शेट्टीनं अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव घेतलं. शिल्पा म्हणाली, “कार्तिक माझा सध्याच्या काळातील क्रश आहे.”

दरम्यान कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘भूल भुलैय्या’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असताना बॉलिवूड चित्रपट मात्र फ्लॉप होताना दिसत आहेत. मात्र कार्तिकच्या चित्रपटानं हे चित्रच पलटवलं. या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा आडवाणी आणि तब्बू यांची मुख्य भूमिका होती.

शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा ‘निकम्मा’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिमन्यु दसानी आणि शर्ली सेतिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सब्बीर खान यांनी केलं आहे. या व्यतिरिक्त ती रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा देखील मुख्य भूमिकेत आहे.