पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. १९ जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. त्यानंतर अवघ्या २ महिन्यांनी राज कुंद्रा घरी परतला आहे. राज त्याच्या काळ्या मर्सिडीजमधून जुहूच्या त्याच्या घरी परतला आहे. यावेळी या गाडीच्या सुरक्षेचे काम बॉडीगार्ड रवी करत होता. फोटोग्राफर्स आणि गाडीच्या समोर असलेली गर्दी घालवतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. नेटकरी शिल्पाच्या या बॉडीगार्डच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिल्पाचा बॉडीगार्ड रवि राजच्या गाडीच्या समोर धावताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांची मने जिंकली. शिल्पाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर देखील तो तिच्या कुटुंबासाठी असाच उभा होता असे त्यात सांगण्यात आले आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘याला म्हणतात प्रामाणिकपणा!! कोणत्या ही परिस्थितीत तुमच्यासोबत उभी राहिल अशी व्यक्ती शोधणे खूप कठीण आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘याच्यासारखा प्रामाणिक असणे कठीण आहे, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शिल्पाच्या बॉडीगार्डची स्तुती केली आहे.’

shilpa shetty bodygaurd video comment,
शिल्पा शेट्टीच्या बॉडीगार्डचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चौकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आणखी वाचा : कियारा आडवाणीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच करणार लग्न? अभिनेत्याने सांगितला प्लॅन

शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

Story img Loader