बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. वडिलांना जामीन मंजूर झाल्यानंतर मुलगा विहान कुंद्रांने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

विहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विहान आई शिल्पा आणि बहिण समिक्षासोबत दिसत आहे. हा फोटो गणेशोत्सवादरम्यानचा आहे. हा फोटो शेअर करत ‘गणपती बाप्पाच्या सोंडेप्रमाणे आयुष्य, त्यांच्या उंदरासारख्या लहान अडचणी आहेत, मोदकांसारखे गोड क्षण, गणपती बाप्पा मोरया,’ अशा आशयाचे कॅप्शन विहानने दिले आहे.

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं होतं भाष्य म्हणाली…

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चौकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत.

आणखी वाचा : २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये ‘विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

Story img Loader