देशभरात करोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतं आहे. सामान्य जनतेपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळे करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला करोना झाल्याची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली आहे. “मागील १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची करोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे त्याच्यां त्यांच्या रुममध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. आमच्या घरातील दोन कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे आणि वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” असे शिल्पा म्हणाली.

पुढे शिल्पा म्हणाली, “देवाच्या कृपेने सर्व जण बरे होत आहेत. माझी करोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे. बीएमसी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या मदतीचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आभार. तुम्ही करोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा..तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा,” अशा आशयाची पोस्ट शिल्पाने केली आहे.

शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाची करोना चाचणी पॉझिटिव्ह येण्या आधी बॉलिवूडमध्ये आमिर खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, आलिया भट्ट, रणबीर कपूर सारख्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. तर गेल्या वर्षी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब सोबत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांना करोनाची लागण झाली होती.

Story img Loader