बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पा तिचा पती राज कुंद्रा मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत शिल्पा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. सतत होणाऱ्या ट्रॉलिंग वर शिल्पाने आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “काही वर्षांपूर्वी वाचलेला एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. एकदा एक व्यक्ती काही लोकांसमोर बसला आणि त्याने एक विनोद केला. तो विनोद ऐकल्यानंतर सगळे हसू लागतात. काही वेळानंतर त्याने पुन्हा एकदा तोच विनोद केला यावेळी थोडेच लोक हसले आणि तो पुन्हा पुन्हा तो विनोद करत राहिला. काही वेळानंतर तिथे कोणी हसत नव्हतं. हे पाहता तो हसला आणि म्हणाला, जर तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच विनोदावर हसू शकत नाही तर तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीवर का रडतात?” असे शिल्पा म्हणाली.

आणखी वाचा : माझे पणजोबा स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामुळेच मला…; कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : KBC 13 : उंच आहात तर घरातील पंखे तुम्ही साफ करता का? एका लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे बिग बींनी दिले भन्नाट उत्तर

पुढे शिल्पा म्हणाली, “तेव्हापासून हा विचार माझ्या मनात राहिलाय. अर्थात मला असं वाटतं की एखाद्याने दुःख व्यक्त करु नये किंवा रडू नये असे म्हणण्याचा त्याचा हेतू नव्हता. तुम्हाला संपूर्ण वेदना दूर कराव्या लागतील. पण याचा अर्थ हा शेवटी तुम्ही यातून बाहेर पडून नव्याने सुरुवात करने असा आहे.”