बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीवर असलेल्या आरोपांमुळे शिल्पा नेहमीच ट्रोल होताना दिसते. राज कुंद्रा अजूनही न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे. दरम्यान, आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिल्पाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

राज कुंद्राला अटक केल्यापासून शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय नसते. नेहमी प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर एकतरी पोस्ट शेअर करणाऱ्या शिल्पाने १३ दिवसांनंतर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत शिल्पाने सगळ्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

शिल्पाच्या या पोस्टवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘सुपर से उपर कुंद्रा आहे.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘राज कुंद्रा कधी येतोय?’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

shilpa shetty, shilpa shetty instagram,
शिल्पाच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे,

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाला देखील पॉर्नोग्राफी प्रकरणाविषयी माहित असेल अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने त्यांच्या घरी जाऊन शिल्पाची चौकशी केली होती. याच काळात शिल्पाचा हंगामा २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर शिल्पाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

 

Story img Loader