बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या सौंदर्याप्रमाणे तिच्या फिटनेसमुळे ही ओळखली जाते. शिल्पा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. शिल्पाने एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पा आणि तिचा पती राज हे जीममध्ये असल्याचे दिसतं आहे. शिल्पाने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला राज बोलतो, ‘भांगडा पावा कमॉन’. यानंतर शिल्पा भांगडा करत कार्डिओ वर्कआऊट करताना दिसतं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा : मासिक पाळी आणि १०२ ताप, रवीनाने सांगितला ‘टिप टिप बरसा पाणी’च्या चित्रीकरणाचा अनुभव
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘सोसायटीतल्या लोकांनी पोलिसांना पैसे दिले’, पायल रोहतगीच्या अटकेवर संग्राम सिंग संतप्त
दरम्यान, शिल्पा बऱ्याच दिवसांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शिल्पा परेश रावल, मीझान जाफरी आणि प्रणिता सुभाष यांच्यासह ‘हंगामा 2’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘निकम्मा’ चित्रपटात ती अभिमन्यू दसानी आणि शर्ली सेटियासोबत काम करताना दिसणार आहे.