बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या अटकेनंतर सतत चर्चेत असते. पॉर्न फिल्म प्रकरणात राजच्या अटकेनंतर शिल्पा बऱ्याच वेळ सोशल मीडिपासून बराच वेळ लांब होती. मात्र, त्यानंतर शिल्पा पुन्हा एकदा ‘सुपर डान्सर ४’ मध्ये परिक्षक म्हणून दिसली. मानसिकदृष्ट्या त्रस्त असलेल्या शिल्पाला योग आणि अध्यात्माची खूप साथ मिळाली आहे. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून योगामुद्रेतील तिचा फोटो शेअर केला आहे. ‘आपल्या विचारांमध्ये खूप शक्ती असते ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन घडतो. आपण आपलं यश कसं सांभाळायचं हे सगळं आपल्या हातात असून तो आपल्या मनाचा खेळ आहे. आपल्या कामगिरीमुळे आपली विचार करण्याची आणि इतरांशी बोलण्याची पद्धत बदलते का? आयुष्यात मिळालेल्या कोणत्याही धक्क्यामुळे तुम्हाला असे वाटते का की तुम्ही सर्व काही गमावले आहे? जर तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांवर नियंत्रण आणले तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. यश आणि अपयशाचे सुख आणि दु:ख तुमच्यावर ओढवू देऊ नका. आता आयुष्य जगा, सर्व काही तात्पुरते आहे…तुम्हीसुद्धा!’, अशा आशयाचे कॅप्शन शिल्पाने तो फोटो शेअर करत दिले आहे.
आणखी वाचा : …म्हणून सिद्धार्थची आई घेते शेहनाजची काळजी
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील भिडे गुरुजी आणि टप्पूमुळे चाहत्यांची चिंता वाढली
पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा हळूहळ पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. शिल्पाने १३ वर्षांनंतर ‘हंगामा २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री केली आहे. या चित्रपटात शिल्पासोबत परेश रावल, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर लवकरच शिल्पा ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे.