बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपरमॉम शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली असून पुढचे काही महिने तिला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र अशा परिस्थितीतही ती सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. तिने शेअर केलेले व्हिडीओही अनेकदा चर्चेत असतात. आताही तिने मुलाचा एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या बिझनेसची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान वयाच्या अवघ्या १० व्या वर्षीच बिझनेसमन झाला आहे. याची माहिती शिल्पानेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. १० वर्षीय वियान कुंद्राने त्याचं युनिक बिझनेस वेंचर सुरू केलं आहे. शिल्पाने वियानचा एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या नव्या स्टार्टअपची माहिती चाहत्यांना दिली आहे.
आणखी वाचा-“एक बॉटल दोन ग्लास…” हृता दुर्गुळेचा भन्नाट उखाणा ऐकलात का?

शिल्पाने मुलाच्या स्टार्टअपची घोषणा करतानाच त्याच्या कस्टमाइज स्नीकर्सची डिझाइनही चाहत्यांना दाखवली आहे. वियानने हे स्नीकर्स त्याच्या आईसाठी म्हणजेच शिल्पा शेट्टीसाठी तयार केले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा मुलगा वियान कुंद्राच्या या बिझनेस वेंचरचं नाव ‘VRKICKS’ असं आहे. ज्यात वियान कस्टमाइज स्नीकर्स तयार करतो. या स्नीकर्सची किंमत ४९९९ रुपयांपासून सुरू होते.

शिल्पा शेट्टीने तिच्या मुलाचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “माझा मुलगा वियान राजचं पहिलं आणि अनोखं बिझनेस वेंचर @vrkicks, यामध्ये कस्टमाइज स्नीकर्स तयार केले जातात. लहान मुलांना त्यांच्या स्वप्नांसाठी नेहमीच प्रोत्साहन द्यायला हवं. वेंचरची संकल्पना ते डिझाइन आणि या सगळ्याच्या प्रवास या व्हिडीओमध्ये आहे. हे सर्व त्यानेच केलं आहे. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात त्याने त्याच्या बिझनेसमधील कमाईचा काही भाग दान करण्याचा संकल्प देखील केला आहे. ऑल द बेस्ट माझ्या बाळा.”

आणखी वाचा-शिल्पाने व्हिलचेअरवर असूनही पाळला दिलेला शब्द! व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी आनंद व्यक्त करत वियानचं कौतुक केलं आहे, त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. याशिवाय काही सेलिब्रेटींनी कमेंट करत वियानच्या प्रॉडक्टची वाट पाहत असल्याचंही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty son viaan kundra become a businessman actress share video mrj