बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी ही सातत्याने चर्चेत होती. शिल्पा शेट्टी ही अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तिने तिच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.

‘सुखी’ असे शिल्पा शेट्टीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरवर शिल्पा शेट्टीचा अनोखा लुक पाहायला मिळत आहे. यात शिल्पा शेट्टीच्या एका हातात लाटणे, इस्त्री अशा वस्तू दिसत आहे. तर तिच्या दुसऱ्या हातात पाकिट, डब्बा, घड्याळ अशा वस्तू पाहायला मिळत आहे. तसेच तिच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरु आहेत.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
suyash tilak and suruchi adarkar
“त्यावेळी मी सुरुचीशी खूप…”, सुयश टिळकने सांगितली ‘का रे दुरावा’ मालिकेदरम्यानची आठवण; म्हणाला, “मी थेट…”
Reshma Shinde Gruhapravesh
Video : “पवनने ज्याप्रकारे माझा हात घट्ट…”, रेश्मा शिंदेचा सासरी थाटात गृहप्रवेश! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
shilpa shetty
ईडीच्या छापेमारीनंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट; म्हणाली, “जीवनात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते…”

शिल्पा शेट्टी हे पोस्टर शेअर करताना म्हणाली, “मी थोडी मूर्ख आहे. माझे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक आहे. जगाने मला निर्लज्ज म्हटलं तरी काय? माझी स्वप्ने इतर कोणापेक्षा कमी नाहीत.” विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीच्या आगामी सुखी चित्रपटाची टॅगलाईनही फार भन्नाट आहे. ‘बेधडक, बेशरम आणि बेपरवाह’, अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

“पप्पा खूप काही खरेदी करू शकतात पण…”, कंगना रणौतची आलिया भट्टवर अप्रत्यक्ष टीका

‘सुखी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सोनल जोशी करत आहे. तर त्याची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा करत आहेत. या चित्रपटात शिल्पा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader