बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिल्पा पती राज कुंद्राच्या पॉर्न प्रकरणात अटक झाल्यानंतर सोशल मीडियापासून बराच वेळ लांब होती. त्यानंतर मध्येच ती काही पोस्ट करत सकारात्मक मेसेज चाहत्यांना द्यायची. आता शिल्पाने सोशल मीडियावर आणखी एक सकारात्मक पोस्ट शेअर केली आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकाचे एक पान शेअर केले आहे. यातुन शिल्पाने तिच्या भविष्यातील नियोजनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोणीही भूतकाळात जावून पुन्हा नवीन सुरुवात करु शकत नाही. परंतु, आपण वर्तमानात एक नवीन सुरुवात करून त्याला एक नवा अंत देऊ शकतो’, असे त्या पुस्तकात सांगण्यात आले आहे.

 

shilpa shetty, shilpa shetty instagram,
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

पुढे त्यात सांगण्यात आले आहे की प्रत्येक व्यक्ती आपला बराच वेळ आपल्या वाईट निर्णय आणि चुकांबद्दल विचार करण्यात घालवते. ‘आपण आपला बराच वेळ चुकीचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण करण्यात वाया घालवतो, आपण केलेल्या चुका, ज्या मित्रांना आपण दुखावले. त्याचवेळी आपण परिपक्वता आणि सहनशीलता दाखवली असती किंवा केवळ चांगले व्यवहार ठेवले असते तर, आता आपण कितीही या गोष्टीचा विचार करू शकत असलो तरी आता आपण भूतकाळ बदलू शकत नाही.’

आणखी वाचा : दिया मिर्झाने मुलाचा पहिला फोटो केला शेअर, कमेंट करत प्रियांका म्हणाली…

पुढे त्यात सांगण्यात आले की, ‘पण आपण हे सगळे विसरून पुढे जाऊ शकतो, अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो, जुन्या चुका टाळू शकतो आणि आपण आसपासच्या लोकांसोबत चांगले वागू शकतो, पण आता आपल्याकडे स्वत: मध्ये बदल घडवून आणण्यासाठी असंख्य संधी आहेत. मला आता माझ्या भूतकाळातल्या चुका स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही आहे, मी माझे भविष्य मला जसे पाहिजे तसे घडवू शकते.’

आणखी वाचा : ‘तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत आहे की…’, बोल्ड ड्रेसने फजिती केल्यानंतर नोरा फतेही झाली ट्रोल

शिल्पा नुकतीच वैष्णोदेवीला जाऊन आली आहे. तिथले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्याचवेळी राज कुंद्रा विरुद्ध आरोपपत्रामध्ये ४३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल आहेत. या ४३ साक्षीदारांमध्ये शिल्पा शेट्टीचाही समावेश आहे.

Story img Loader