बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हरमन बवेजा आणि सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘ढिशक्याव’ चित्रपटाची निर्मिती शिल्पा करत आहे. तसेच, या चित्रपटात ती एक आयटम नंबर करणार असल्याचीही चर्चा आहे.
शिल्पा शेट्टीने विवानला जन्म देण्यापूर्वी तिच्या चित्रपट करियरमध्ये ‘शूल’मधील ‘दिलवालो के दिल’ आणि ‘दोस्ताना’मध्ये ‘शट अप अँण्ड बाउन्स’ या आयटम नंबरवर नृत्य केले होते. तिच्या लटके-झटक्यांनी बॉलीवूडवर छाप सोडल्यानंतर ही यमी-ममी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुर्नपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘ढिश्क्याव’मध्ये ती आयटम नंबर करणार असून, त्यास सचिन-जिगर संगीत देणार आहेत.
‘नच बलिए’ या रिअॅलिटी शोची शिल्पा परिक्षक होती. ‘ढिश्क्याव’चे दिग्दर्शन सनमजित तलवारने केले असून यात आदित्य पंचोली आणि आयशा खन्ना यांच्याही भूमिका आहेत.