बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली होती. एवढंच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या सगळ्याचा त्रास झाला. आता शिल्पा राज कुंद्रापासून विभक्त होणार अशा चर्चा सुरु आहेत.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या सगळ्याचा शिल्पावर खूप परिणाम झाला आहे. शिल्पाच्या जवळच्या एका मैत्रिणीने शिल्पाच्या घरी सुरु असलेल्या गोष्टींविषयी सांगितले आहे. ‘हे हिरे आणि ड्युप्लेक्स कसे येत आहेत याची कल्पना शिल्पाला नव्हती. आता शिल्पाला राजने दिलेल्या वस्तूला हात देखील लावायची इच्छा नाही. शिल्पा आत्मनिर्भर आहे आणि ती स्वत: ची आणि तिच्या मुलांची काळजी घेऊ शकते. शिल्पाने चित्रपटसृष्टीतील काही लोकांना सांगितले आहे की तिला ‘हंगामा २’ आणि ‘निकम्मा’ या चित्रपटांनंतर आणखी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे,’ असे शिल्पाच्या मैत्रिणीने सांगितले.

आणखी वाचा : ‘याला म्हणतात अश्लीलता…’, निकसोबतच्या त्या फोटोमुळे प्रियांका झाली ट्रोल

शिल्पाला दिग्दर्शक अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी त्यांच्या चित्रपटासाठी विचारल्याच्या चर्चा आहेत. सध्या शिल्पाने या सगळ्यावर कोणतीही माहिती दिलेली नाही. तर शिल्पा आणि राज विभक्त होणार आहेत अशाही चर्चा आहेत.

आणखी वाचा : करिश्मा आणि करीनाच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते- रणधीर कपूर

दरम्यान, पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची चौकशी झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर शिल्पा प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. हे पाहता शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्हाला प्रायव्हसीची गरज असल्याचे सांगितले होते.

Story img Loader