महिलांवर होणा-या वाढत्या अत्याचाराबाबत बॉलीवूड सेलिब्रिटीही त्यांचे मत व्यक्त करत आहे. शनिवारी विलेपार्ले येथील भाईदास हॉलमध्ये गणेश मंडळांना महिलांच्या सुरक्षेबाबतची सूचना देण्यासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने महिलांना बचावासाठी स्वतःजवळ चाकू बाळगण्याचा सल्ला दिला.
‘महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी गणेश मंडळांची’- सत्यपाल सिंह
शिल्पा म्हणाली की, काही लोक आणि अत्याचार करणारे विकृत विचारांचे असतात. पोलीस महिलांच्या बचावासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत आहेत. पण ते तरी किती प्रयत्नशील राहतील? महिलांनी स्वतःवर अवलंबून राहायला हवे आणि गर्दीत असताना स्वतःजवळ चाकूही बाळगण्याची गरज आहे. आपण वृत्तपत्रांमध्ये अत्याचाराच्या बातम्या वाचतो. मी कधी कधी विचार करते, आपण कोणत्या प्रकारच्या समाजात राहत आहोत, असेही ती म्हणाली. तसेच तिने पोलीस अतिशय चांगले काम करत आहेत असे म्हणत त्यासाठी त्यांचे आभारही मानले.

Story img Loader