करोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. अशातच ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘आंखे’, ‘बेवफा सनम’, ‘खुदा गवाह’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर करोनावरील लस घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. तिने दुबईमध्ये करोनावरील लस घेतली आहे. सध्या शिल्पा चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिल्पाने लस घेतनाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शिल्पा शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने करोना लस घेण्याचा अनुभव सांगितला आहे. शिल्पाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने मास्क घातले असून पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. ‘मी लस घेतली आहे आणि सुरक्षित… न्यू नॉर्मल… २०२१मध्ये आले’, असे तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

करोना व्हायरसवरील लस घेणारी शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. शिल्पाने दुबईमध्ये करोना लस घेतली आहे. शिल्पाने लग्न केल्यानंतर ती थोडे दिवस भारतात राहीली. नंतर ती दुबईला शिफ्ट झाली. एका मुलाखतीमध्ये शिल्पाने २००० साली लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर ती पाच वर्षे भारतात राहिली आणि नंतर दुबईला शिफ्ट झाल्याचे म्हटले जाते. शिल्पा दुबईमध्ये कुटुंबीयांसोबत राहते.

Story img Loader